Pune Shocker: पालकांमधील सततच्या वादाला कंटाळून एका 15 वर्षीय मुलाने बुधवारी रात्री देहू रोड रेल्वे स्थानकाजवळ (Dehu Road station) चालत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे. देव संजय कुमार असे मृत मुलाचे नाव आहे. त्यांचे वडील संजय कुमार हे भारतीय सैन्यात सहाय्यक अधिकारी म्हणून काम करतात. त्यांची सध्याची पोस्टिंग देहू रोड कार्यालयात येथे आहे.
देव आणि त्याचा धाकटा भाऊ संजय कुमार यांच्यासोबत राहतात, तर त्यांची आई वेगळ्या ठिकाणी राहते. पुणे रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, त्याच्या आत्महत्येमागे मृताच्या आई-वडिलांमध्ये सुरू असलेल्या वादाची भूमिका होती का? याचा तपास सुरू आहे. (हेही वाचा -Thane Shocker: माजी नगराध्यक्ष गणेश साळवी यांच्या भावाने पत्नीवर झाडल्या गोळी; नंतर हृदयविकाराचा झटका आल्याने दिलीप साळवी यांचा मृत्यू)
प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय विद्यालयात दहावीचा विद्यार्थी असलेला देव बुधवारी रात्री कोणालाही न सांगता घरातून निघाला आणि देहू रोड रेल्वे स्थानकाकडे गेला. तेथे त्याने चालत्या ट्रेनसमोर उडी मारली. त्याचा मोबाइल फोन तपासल्यानंतर पोलिसांना कळले की, देवने त्याच्या एका मित्राला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला होता. मेसेजमध्ये, त्याने त्याच्या मित्राची प्रतिक्रिया विचारली होती की, मी जर आत्महत्या केली तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? त्यानंतर काही वेळातचं त्याने आपल्या मित्राला दुसरा मेसेज पाठवला की, तो आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडला आहे.
याशिवाय, पोलिसांनी शोधून काढले की देवने त्याच्या फोनवर काही गेम स्थापित केले होते, परंतु यापैकी कोणत्याही गेमने त्याचे जीवन संपवण्याच्या निर्णयावर थेट प्रभाव टाकला असा कोणताही पुरावा नाही. या घटनेचा रेल्वे पोलीस कसून तपास करत आहेत.