मुंबई लोकलच्या (Mumbai Local) मध्य (Central Railway), आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) तसेच ट्रान्स हार्बर (Trans Harbour Railway) मार्गांवर विविध तांत्रिक कामानिमित्त आज 9 फेब्रुवारी रोजी सकाळपासून मेगाब्लॉकचे (Megablock) नियोजन करण्यात आले आहे. यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द राहतील तर अन्य ठिकाणी लोकल उशिराने धावणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे फेरेरे पूल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर काल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान आठ तासांचा विशेष रात्रकालीन ब्लॉक पश्चिम रेल्वेने घोषित केला होता. त्यामुळे आज पश्चिम रेल्वेवर मात्र कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही.
दरम्यान, मध्य रेल्वेतर्फे ट्विट च्या माध्यमातून आजच्या ब्लॉक विषयी माहिती देण्यात आली असून या वेळापत्रकानुसार प्रवाशांनी आपले प्रवास नियोजित करण्याचे आव्हान सुद्धा करण्यात आले आहे.
जाणून घ्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक
मध्य रेल्वे
आज सकाळी 8. 40 पासून ते दुपारी 1. 10 पर्यंत मध्ये रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा स्थानकाच्या दरम्यान डाऊन दिशेच्या जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दरम्यानच्या सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जातील. नेहमीपेक्षा लोकलच्या फेऱ्या 15 ते 30 मिनिट उशिराने धावतील.
हार्बर रेल्वे
सीएसएमटी- चुनाभट्टी/ वांद्रे डाऊन मार्गावर आज सकाळी 11. 40 ते दुपारी 4. 10 च्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे तर चुनाभट्टी/ वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11. 40 ते 3. 10 पर्यंत ब्लॉक असेल. यावेळात तर लोकलच्या फेऱ्या रद्द असतील. सोबतच सीएसएमटी- पनवेल/ वाशी/ बेलापूर मार्गावर सकाळी 9.53 ते दुपारी 2. 44 दरम्यानच्या लोकल रद्द असणार आहेत तसेच सीएसएमटी- गोरेगाव/ वांद्रे हार्बर मार्गावरील लोकल सुद्धा सकाळी 10. 45 ते 4. 58 दरम्यान रद्द असतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठे पनवेल व कुर्ला येथून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.
पहा ट्विट
दिनांक ९.२.२०२० रोजी मेगा ब्लॉक pic.twitter.com/aJteSXqixZ
— Central Railway (@Central_Railway) February 8, 2020
दरम्यान आज मुंबईत आयोजित केल्या गेलेल्या मुंबई पोलीस मॅरेथॉनच्या (Mumbai Police Marethon) निमित्ताने मध्यरात्री 2. 30 वाजता मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर दोन विशेष लोकल देखील आयोजित करण्यात आल्या होत्या.