Coronavirus (Photo Credits: PTI)

Coronavirus Cases In Mumbai: मुंबईत आज दिवसभरात 979 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 28 हजार 550 इतकी झाली आहे. आतापर्यंत 1 लाख 1 हजार 861 जणांनी कोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 19 हजार 354 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 7 हजार 35 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्यात आज 10 हजार 484 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण 4 लाख 01 हजार 442 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.09 टक्के एवढे आहे. आज राज्यात 12 हजार 608 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 51 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (हेही वाचा - COVID19 Cases In Maharashtra Today: महाराष्ट्रात आज 12 हजार 608 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 364 जणांचा मृत्यू)

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 30 लाख 45 हजार 085 नमुन्यांपैकी 5 लाख 72 हजार 734 नमुने पॉझिटिव्ह (18.8 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 32 हजार 105 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या 37 हजार 386 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. याशिवाय आज राज्यात 364 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.39 टक्के एवढा आहे.