Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

Coronavirus Outbreak: धारावीत (Dharavi) आज 94 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 590 वर पोहोचली आहे. आतापर्यंत धारावीत 20 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

धारावी हे ठिकाण कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत आहेत. याशिवाय महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईमध्ये आढळून येत आहेत. याशिवाय मुंबईमध्ये आज 441 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8613 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 343 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय आतापर्यंत 1804 जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (हेही वाचा - मुंबईमध्ये आज 441 नव्या रुग्णांची भर, तर 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू; 3 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात 2487 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 83 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या भारतात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40,263 वर पोहोचली आहे. यातील 28,070 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 10887 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.