नांदेडमध्ये आज 94 नवे कोरोनाबाधित रुग्ण; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 869 वर पोहचली
Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची (Coronavirus Patient) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात आज 94 कोरोनाविषाणू बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 869 झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील 7 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण 476 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्हयात 349 रुग्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - 12 हजार 538 पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती)

दरम्यान, शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात काल 8 हजार 308 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 92 हजार 589 इतकी झाली आहे.