Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात 841 नव्या रुग्णांसह कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 15,525 वर
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 46,711 वर पोहोचली असून एकूण 1,583 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात आज नवे 841 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 15,525 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. तर आज दिवसभरात 34 रुग्ण दगावल्याची माहितीही त्यांनी आहे. याचबरोबर दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात आज एकूण 2819 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या मुंबईत आज कोरोनाचे 635 नवे रुग्ण आढळले असून मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 9758 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात मुंबईत 26 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 387 वर पोहोचली आहे. धारावी मध्ये आढळले 33 नवे COVID-19 रुग्ण, कोरोना बाधितांची एकूण संख्या 665 वर

भारतात विचार केला असता कोरोना बाधितांची एकूण संख्या 46,711 वर पोहोचली असून एकूण 1,583 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात 31,967 रुग्ण सध्या उपचार घेत असून 13,160 रुग्ण बरे झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात सध्या एकूण प्रयोगशाळा असून त्यापैकी 25 शासकीय आणि 20 खासगी प्रयोगशळा आहेत. दररोज त्यांच्या माध्यमातून सात हजारपेक्षा जास्त चाचण्यांची क्षमता आहे. कालपर्यंत राज्यात पावणे 2 लाख नमुन्यांपैकी 1 लाख 62 हजार नमुने निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.