
केंद्र आणि राज्य सरकार प्रमाणेच आता पालिका कर्मचार्यांनादेखील सातव्या वेतन आयोगाचा (7th Pay Commission) फायदा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad ) महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हा नफा होणार असून यानुसार, जानेवारी 2020 च्या पगारासोबत कर्मचार्यांना पगारामधील तफावत दिली जाणार आहे. याबाबतच्या निर्णयाला नुकतीच महाराष्ट्र सरकारतर्फे मंजुरी देण्यात आली असून कर्मचारी महासंघाने देखील या निर्णायाचं स्वागत केलं आहे. यासोबतच महाराष्ट्र सरकारने मागील वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फायदा देण्याचे घोषित केले होते यात तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता. यानंतर आता आलेल्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचे दणदणीत गिफ्ट मिळणार असल्याचे जाहीर झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, 30 जानेवारी 2019 च्या शासन आदेशानुसार, 1 जानेवारी 2016 पासून सातवं वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. कर्मचार्यांसोबत पेंशनधारकांनाही त्याचा फायदा होणार आहे. मात्र आता याबाबत ठोस निर्णय घेणयात आला असून यानुसार, 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीमधील सुधारित वेतनश्रेणी व भत्त्यांपोटी थकीत राहिलेली रक्कम जानेवारी 2020 च्या वेतनासोबत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7th Pay Commission News: दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यपकाच्या 89 पदांसाठी भरती, 57 हजार रुपयांचा पगार कमवण्याची नामी संधी; वाचा सविस्तर
दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चालू अंदाजपत्रातील 940 कोटी रूपयांची रक्कम आत्तापर्यंत कर्मचार्यांच्या वेतनावर खर्च करण्यात आली आहे. या एकूणच वेतन संबंधित खर्चामुळे सरकारी तिजोरीवर तब्बल 40 हजार कोटींचा भार वाढला आहे.