Garbage Pickup Vehicle प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Man Killed After Hit By Garbage Pickup: ठाण्यातून (Thane) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या ( Thane Municipal Corporation) कचरा उचलणाऱ्या वाहनाची (Garbage Pickup Vehicle) धडक बसल्याने 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सीताराम सखाराम थोराम, असं मृताचं नाव आहे. ते दिवा येथील संतोष नगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. दिवा पूर्वेकडील तुळजा भवानी मंदिराजवळ शुक्रवारी संतोष नगरमध्ये ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, कचरा गाडी चालवणाऱ्या चालकाचे नाव मनोज कदम असे आहे. स्थानिक आणि जवळच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चालकाला घटनेची माहिती दिली. वृद्धाला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले, जिथे पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. (हेही वाचा -Accident Caught on Camera in Ghaziabad: गाझियाबादमध्ये कचरा भरणाऱ्या ट्रकच्या धडकेत 2 वर्षीय मुलगी गंभीर जखमी; पहा व्हिडिओ

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालकाविरुद्ध 106(1), 281 भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या 184 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस जवळच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत आणि अपघाताच्या वेळी नेमके काय घडले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. (हेही वाचा - Mumbai: धक्कादायक! कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू)

दरम्यान, काही वर्षांपूर्वी डोंबिवली शहरातील खंबालपाडा परिसरात कचरा गाडीने एका दुचाकी स्वाराला जोरात धडक दिली होती. या धडकेमुळे दुचाकीस्वार खाली पडून गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेली महिला जागीच ठार झाली होती.