आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. आज शहरामध्ये 743 कोरोनाच्या रुग्णांची नोंद व 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 1,37,091 वर पोहोचली आहे. आज मुंबईमधून कोरोनाचे 1,025 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,11,084 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोनाच्या 18,263 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज झालेल्या 20 मृत्युंसह शहरामध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 7,439 झाला आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.
आज मृत्यू झालेल्या 16 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 13 रुग्ण पुरुष व 7 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 जणांचे वय 40 वर्षा खाली होते. 13 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 6 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बारे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के झाला आहे. 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.80 टक्के होता. मुंबईमध्ये 23 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 7,09,583 इतक्या आहेत. मुंबईतील सध्या दुप्पटीचा दर 87 दिवस झाला आहे.
एएनआय ट्वीट -
743 new #COVID19 cases, 1,025 recoveries & 20 deaths reported in Mumbai today. The total number of positive cases increases to 1,37,091 in Mumbai, including 18,263 active cases, 1,11,084 recovered cases & 7,439 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Maharashtra pic.twitter.com/wkTmpB84pC
— ANI (@ANI) August 24, 2020
मुंबईमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 23 ऑगस्ट नुसार सध्या शहरामध्ये 604 सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) आहेत व सक्रिय सीलबंद इमारती या 5,834 आहेत. मुंबईमधील धारावी परिसरात, आज दिवसभरात कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळले असून, या परिसरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 2713 वर पोहोचली आहे. सद्य घडीला धारावीतील 83 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.