महाराष्ट्र भाजप चा सुद्धा आहे, कंगना व सुशांत पेक्षा 'या' मुद्द्यांवर बोला; पावसाळी अधिवेशनासाठी शिवसेनेचा सल्ला
Sanjay Raut, Devendra Fadnavis, Kangana Ranaut (Photo Credits: Edited )

महाराष्ट्रात आजपासुन दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (Monsoon Session)  सुरु होत आहे, याच पार्श्वभुमीवर आज सामनाच्या अग्रलेखातुन (Saamana Editorial) शिवसेनेने (Shivsena)  विरोधी पक्षाला आपल्या कर्तव्याची आठवण करुन देत शालजोडीतुन सल्ला दिला आहे. आज महाराष्ट्रासमोर कोरोनाची वाढती रुग्णसंख्या (Coronavirus In Maharashtra) , विदर्भातील पुराने झालेले नुकसान (Vidarbha Flood) , विद्यार्थ्यांच्या परिक्षा (University Exams) असे मोठे प्रश्न आहेत, या प्रश्नांंची चर्चा आज पासुन सुरु होणार्‍या पावसाळी अधिवेशनात झाली पाहिजे. अन्यथा त्याऐवजी आज मुंबई मध्ये खाउन पिउन तरारलेली आणि मराठी अस्मितेवर दारुच्या गुळण्या करणारी उपरी कंंगना (Kangana Ranaut)  आणि सुशांंत सिंंह राजपुत (SSR)  हेच मुद्दे विरोधी पक्ष उचलुन धरेल तर अन्य मुद्दे बाजुस पडतील. मुंंबई व महाराष्ट्र जितका शिवसेना, कॉंग्रेस (Congress)  व राष्ट्रवादीचा (NCP) आहे तितकाचा भाजपाचा (BJP)  सुद्धा आहे त्यामुळे आज चर्चा करताना मुंंबई व पोलिसांंचा अपमान करणार्‍यांंविरुद्ध पक्षभेद मोडुन धिक्कार करायला हवा असा सल्लाही आजच्या अग्रलेखातुन दिलेला आहे. यातीलच काही मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे.

सामनातुन कंंगना वर टीकास्त्र

मुंंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर म्हणुन समस्त मराठी जनांंचा अपमान करणार्‍या मेंंटल महिलेला जर का महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही अशी भुमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांंनी मांंडली तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करायला हवं अशा शब्दात अग्रलेखातुन कंंगना च्या विरुद्ध शिवसेनेची भुमिका पुन्हा एकदा उघड करण्यात आली आहे तर मुंंबई पोलिसांंच्या कामाचा पाढा वाचुन दाखवत त्यांंना माफिया म्हणणार्‍यांंची चौकशी व्हावी अशी मागणीही शिवसेनेने केली आहे . Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रणौतने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी विचार करील - संजय राऊत

भाजप ची कानटोचणी

कंंगना किंंवा सुशांंत सिंंह राजपुत सारख्या राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांंना थोडं बाजुला करुन महाराष्ट्रातील कोरोना, पुर, परिक्षा आणि आर्थिक नुकसान या विधायक मुद्द्यांंवर बोलण्याचा आज विरोधी पक्षाने सुद्धा प्रयत्न करायला हवा. फिल्मी उपर्‍या महिलेपेक्षा गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे सोबतच इतरही गंंभीर मुद्दे आहेत ज्याला न्यायप्रिय आमदार वाचा फोडतील अशी अपेक्षा आहे असे म्हणत यावेळेस मवाळ पण उपरोधक भाषेत सामनातुन भाजपची कान टोचणी करण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारला आत्मचिंतन करण्याची गरज- देवेंद्र फडणवीस

दरम्यान, कंंगना विरुद्ध संजय राउत असे टीकायुद्ध मागील काही दिवसात चांंगलेच रंंगले आहे. खासदार व शिवसेना मुखपत्र सामनाचे संंपादक संंजय राउत यांंनी कंंगनाला हरामखोर म्हंंटले होते ज्यावर काल तिने उत्तर देताना राउतांंच्या मानसिकतेवर टीका केली तसेच मी तुमच्या विरुद्ध आहे, महाराष्ट्राच्या नाही कारण तुम्ही मुंंबई किंंवा महाराष्ट्र नाही असे उत्तर दिले होते. या प्रकरणात येणारे ट्विस्ट आज विधानभवनात पण चर्चेत येण्याची पुर्ण शक्यता आहे.