Coronavirus: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलिस दलातील 67 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण
Maharashtra Police | (File Photo)

Coronavirus: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलिस दलातील (Maharashtra Police) 67 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस दलातील 4810 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तसेच आतापर्यंत 59 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोना विरोधच्या लढाईत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. परंतु, ही लढाई लढताना यातील अनेकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. (हेही वाचा -Containment Zones in Mumbai: मुंबईत 750 कंटेनमेंट झोन्स म्हणून घोषित; येथे पाहा पूर्ण यादी))

दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र पोलिस दलातील 77 कर्मचाऱ्यांना कोरोनाची व्हायरसची लागण झाली होती. तर, 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. सोमवारी महाराष्ट्रात 181 जणांचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला असून 5257 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 169883 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 73298 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.