महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूने हाहाकार माजविला असून राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येने लाखांचा टप्पा पार केला आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई (Mumbai) शहरात आहेत. यामुळे मुंबईत आतापर्यत 750 कंटेनमेंट झोन्स (Containment Zones) जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईत काल (29 जून) आणखी 1 हजार 247 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 21 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 76 हजार 294 वर पोहचली आहे. यापैंकी 4 हजार 461 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 43 हजार 545 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. तसेच मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 750 कंटेनेमेंट झोन्स जाहीर करण्यात आले आहेत. पूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
The total number of COVID19 containment zones in Mumbai is 750: Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/gIArVQMAEz
— ANI (@ANI) June 30, 2020
हेदेखील वाचा- Lockdown Extension In Maharashtra: महाराष्ट्रात 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवला, राज्य सरकारची मोठी घोषणा
दरम्यान,लॉक डाऊन पूर्णपणे संपवणे तर सध्या शक्य नाही मात्र 30 जून नंतर मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत राज्यात उद्योग, व्यवसाय आणि खाजगी कार्यालये सुद्धा हळू हळू सुरु केली जाणार आहेत असे ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र यावेळी आपण बेसावध राहून चालणार नाही, काळजी घेतली नाही गर्दी झाली तर पुन्हा संसर्ग पसरेल आणि पूर्ण लॉक डाऊन करण्याला पर्याय उरणार नाही असा इशारा सुद्धा काळ उद्धव ठाकरे यांनी दिला होता.