यंदाच्या उन्हाळी सुट्टीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने येत्या 5 एप्रिल पासून 60 विशेष मेल एक्सप्रेस धावणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच या गाड्यांसाठी विशेष भाडेसुद्धा घेतले जाणार आहे. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडी या मार्गांसाठी विशेष जादा मेल सोडण्यात येणार आहे.
सुट्टीनिमित्त बाहेर जाणाऱ्या पर्यटकांसाठी सीएसएमटी आणि पुणे येथून कोचुवेली, एर्नाकुलम विशेष गाडी असणार आहेत. तर सीएसएमटी ते कोचुवेलीसाठी गाडी क्रमांक 01065 या गाडीची सेवा 15 एप्रिल ते 3 जूनपर्यंत असणार आहे. त्याचसोबत 010066 गाडी कोचुवेली ते सीएसएमटी दरम्यान 16 एप्रिल ते 4 जूनपर्यंतसाठी सुरु करण्यात आली आहे.(हेही वाचा-IRCTC Tatkal Train Ticket: रेल्वे तात्काळ तिकीट बुकींगच्या बदललेल्या वेळा आणि नियम)
तर पनवेल ते सावंतवाडीसाठी विशेष 20 फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. 6 एप्रिल पासून ते 9 जूनच्या कालावधीत 01413 ही गाडी प्रत्येक शनिवार, रविवारी सकाळी 8.15 वाजचा सुटणार आहे. तसेच पुणे ते एर्नाकुलम हमसफर ही विशेष गाडी 15 एप्रिल पासून सुरु करण्यात येणार असून 3 जूनपर्यंत सेवा सुरु राहणार आहे. संध्याकाळी 7.55 वाजता पुण्याहून ही गाडी सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.