महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही बरे होणारे रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, काल (5 ऑगस्ट) दिवसभरात राज्यात 10,309 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे व यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,68,265 अशी झाली आहे. तर राज्यात नवीन 6,165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3,05,521 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,45,961 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील मृतांचा आकडा 16,476 वर पोहोचला असून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.25 टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.
राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (Mumbai) असून येथील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,19,255 वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ ठाणे (Thane), पुणे (Pune), पालघर (Palghar) जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (5 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)
हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,125 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,19,255 वर
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 24 लाख 13 हजार 510 नमुन्यांपैकी 4 लाख 68 हजार 265 म्हणजेच 19.40 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 9 लाख 43 हजार 658 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 466 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर भारतात कोरोना बादिातांची एकूण संख्या 19,08,255 वर पोहचली आहे. त्यापैकी 5,86,244 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 12,82,216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोना संसर्गामुळे देशात एकूण 39,795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.