Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,125 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,19,255 वर
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) 1,125 रुग्णांची व 42 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 1,19,255 वर पोहोचली आहे. आज शहरामधून 711 रुग्ण बरे झाले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 91,673 रुग्ण बरे झाले आहेत. आज मुंबईमध्ये 671 कोरोना विषाणू संशयित रुग्णांची भर्ती करण्यात आली आहे. आजच्या 42 मृत्यूसह मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 6,588 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 20,697 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या 31 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 30 रुग्ण पुरुष व 12 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 24 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 18 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बारे झालेल्या रुग्णांचा दर 77 टक्के इतका आहे. 29 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.87 टक्के राहिला आहे. 4 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 5,67,031 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आता 80 दिवसांवर पोहोचला आहे. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना, नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे अवाहन)

एएनआय ट्वीट -

शहरातील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 4 ऑगस्ट नुसार शहरातील सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 621 इतकी आहे व यासह सक्रीय सीलबंद इमारती या 5609 आहेत. दुसरीकडे मुंबईतील धारावीत आज फक्त 1 कोरोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2589 वर पोहचला असून 77 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच 2254 जणांना आता पर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.