कोरोना व्हायरसने (Coronarviru) चीनसह संपूर्ण देशात थैमान घातले असून लोकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) आतापर्यंत 53 हजार 981 प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून यात 2 संशयित रुग्ण आढळ्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच संशयित रुग्णांपैकी एकावर मुंबई येथे तर, एकावर पुणे येथील रुग्णालयात तपासणी सुरू आहे. कोराना व्हायरसमुले आतापर्यंत 2600 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर, जवळपास 80 हजार नागरिकांना लागण झाल्याचे माहिती समोर आली आहे. तसेच चीन येथून नागरिकांना आपल्या मायदेशात परत आणण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहेत.

कोरोना व्हायरसने सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे चीन येथे आणबाणी लागू करण्यात आली आहे. यातच कोरोना व्हारसचा फटका भारताला बसू नये, यासाठी अधिक प्रतत्न केले जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायसच्या च्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या नवीन सूचनेनुसार चीनसह हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या 10 देशातील प्रवाशांसोबतच आता इराण आणि इटलीतील प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 53 हजार 981 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या एक जण पुणे येथे तर दोघे मुंबईतील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 91 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी 88 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. हे देखील वाचा- दक्षिण कोरियात अमेरिकेच्या सैनिकाला कोरोना व्हायरसची लागण

ट्वीट-

भारताचे शेजारी राष्ट्र असलेला चीन सध्या कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहे. केवळ चीनच नव्हेतर, जगभरातील अनेक देशांसमोर या संकटाने आव्हान निर्माण केले आहे. चीनमधील वुहान शहरातून उगम पावलेल्या या कोरोना व्हायरसने आतापर्यंत विविध देशांतील सुमारे 2 हजार 600 हून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरातील विविध 20 देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, जवळपास 80 हजार लोकांना या रोगाची लागण झाल्याचा आकडा प्रसारमाध्यमांनी दिला आहे.

कोरोना व्हायरस याची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणे सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसे ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.