एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र सरकार झुकायला तयार नाही. 28 ऑक्टोबरपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. शुक्रवारी, राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पीय योजनेत महाराष्ट्रासाठी 3,000 पर्यावरणपूरक बसेस आणण्याची घोषणा केली असून या बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला देण्यात येणार आहेत.
सर्व काही योजनेनुसार झाले, तर येत्या दोन वर्षांत 5,000 जुन्या MSRTC बसेस ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक होणार आहेत. सध्या MSRTC च्या ताफ्यात सुमारे 16,500 बस आहेत. दरम्यान, 2021-2022 च्या शेवटच्या अर्थसंकल्पात 1500 पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम बसेसच्या खरेदीची घोषणाही करण्यात आली होती. तर 2020-2021 मध्ये अशा सुमारे 700 बसेस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. (वाचा - Devendra Fadnavis यांना मुंबई पोलिसांच्या नोटिसीवर उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी प्रतिक्रिया देत राजकीय पक्षांना केलं आवाहन)
महाराष्ट्र रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (MSRTC) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “कोरोना महामारीमुळे या बसेसच्या खरेदी प्रक्रियेला विलंब झाला होता. पण आता 700 बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, जी या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल."
या वर्षाच्या अखेरीस गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या 1,500 बस खरेदीसाठी निधी मिळण्याचीही आम्हाला आशा आहे. आम्हाला निधी मिळाल्यावर, आणखी 1500 अत्याधुनिक ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बस खरेदी करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू केली जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितलं.