मुंबईतील गजबजलेला आणि दाटीवाटीचा परिसर म्हणजे धारावी (Dharavi)... या परिसरात वाढत जाणारी कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या आता ब-यापैकी मंदावली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात या परिसरात 5 नवे रुग्ण आढळले असून या भागात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,745 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत या भागातील 2,392 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन ते बरे झाले आहेत. सद्य घडीला 93 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
भारतात दिवसागणित कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील 24 तासांत 77,266 नव्या रुग्णांची मोठी भर पडली आहे. तर 1,057 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या भरीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 33,87,501 वर पोहचला आहे. तर एकूण 61,529 मृतांची नोंद झाली आहे. सध्या देशात 7,42,023 सक्रीय रुग्ण (Active Cases) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 25,83,948 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) देण्यात आली आहे. Coronavirus Worldwide Cases: कोरोना व्हायरसमुळे जगभरातील रुग्णांचा आकडा 2.43 कोटींच्या पार, आतापर्यंत 829,861 जणांचा बळी
5 new #COVID19 cases reported in Dharavi area of Mumbai today. With this, total number of positive cases rises to 2,745 including 2,392 discharges and 93 active cases: Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Maharashtra
— ANI (@ANI) August 28, 2020
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्यानुसार, जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा एकूण 2.43 कोटींच्या पार गेला आहे. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढून 829000 वर पोहचला आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टिम सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग सीएसएसई यांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीत असे म्हटले आहे की, सकाळपर्यंत कोरोना व्हायरसच्या प्रकरणांचा आकडा 24,356,619 वर पोहचला आहे. तसेच कोविड19 मुळे बळींचा आकडा 829,861 वर गेला आहे.