Covid-19 (Photo Credit: ANI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत (Mumbai) आज कोरोनामुळे आज 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 441 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 8 हजार 613 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 804 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 343 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 17 मेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 40 हजार 263 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 1 हजार 306 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 हजार 887 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, देशात गेल्या 24 तासात 2 हजार 487 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 83 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- Coronavirus Outbreak: धारावीत आज 94 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर 2 जणांचा मृत्यू; धारावीतील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 590 वर पोहोचली

एएनआयचे ट्वीट-

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.