Dahi Handi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Janmashtami 2023: आज 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी साजरी करताना सुमारे 35 गोविंदा जखमी झाले. एकूण जखमी झालेल्या गोविंदांपैकी चार गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच नऊ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर 22 जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. BMC ने दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमी गोविंदांची प्रकृती स्थिर आहे. विविध सरकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांकडून प्राप्त झालेल्या अपडेटमध्ये, दोन गोविंदांना वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची पुष्टी झाली आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत, दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

केईएम रुग्णालयात सध्या एकावर उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. तथापि, सायन हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, जीटी हॉस्पिटल, पोद्दार हॉस्पिटल, एसएल रहेजा हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटल यासह परिसरातील इतर मोठ्या हॉस्पिटल्सनी एकही रुग्ण दाखल नाही. (हेही वाचा -Dahi Handi 2023: माहिमच्या मखदूम शाह बाबा दर्गाच्या दारात गोविंदा पथकाची सलामी; हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र साजरा केला सण (Watch Video))

दरम्यान, पूर्व उपनगरातील राजावाडी रुग्णालयात एका व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. एमटी अग्रवाल हॉस्पिटल, वीर सावरकर हॉस्पिटल, शताब्दी हॉस्पिटल, माँ हॉस्पिटल आणि सर्वोदय हॉस्पिटलसह परिसरातील इतर हॉस्पिटल्सनी कोणत्याही व्यक्तीला दाखल केलेले नाही.

तथापी, पश्चिम उपनगरात एकाही व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. रुग्णालयांमध्ये वांद्रे भाभा रुग्णालय, व्ही एन देसाई रुग्णालय, कूपर रुग्णालय, भगवती रुग्णालय, ट्रुमा केअर रुग्णालय, बीडीबीए रुग्णालय, एस के पाटील रुग्णालय किंवा नानावटी रुग्णालय यांचा समावेश आहे.