मुंबईचं स्पिरीट अनेक लहान लहान क्षणांचा देखील सोहळा करतात. आज दहीहंडी सणाच्या निमित्ताने देखील याची प्रचिती आली आहे. मुंबई मध्ये माहीमच्या मखदूम शाह बाबा दर्गाच्या दारामध्ये गोविंदा पथकाने सलामी देत दिवसाची सुरूवात केली आहे. शिंदे गटामध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या राहुल कनाल यांच्या पुढाकार्‍याने याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी अशाप्रकारे सणाची सुरूवात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान दहीहंडीच्या या सणामध्ये हिंदु-मुस्लिम बांधव एकत्र येत हा सण साजरा करतात. यावेळी 'भारत माता की जय'. 'वंदे मातरम' सोबतच 'मखदूम शाह बाबा' च्या नावाने घोषणा देण्यात आल्या.

माहिम मधील दहीहंडी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)