देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवण्यात आले आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन काळात काही गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध राज्यातील सायबर क्राईम (Cyber Crime) विभागाने 341 गुन्ह्यांची नोंद केली आहे. याप्रकरणी 177 जणांना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, यात आक्षेपार्ह WhatsApp मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी 141 गुन्हे, Facebook पोस्ट्स शेअर प्रकरणी 129, Tiktok व्हिडिओ शेअर प्रकरणी 12, Twitter द्वारे आक्षेपार्ह ट्विट 6, Instagram द्वारे चुकीच्या पोस्ट 4 आणि अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी 49 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी सायबर विभागाला 60 आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश आलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: मुंबई मधील मीरा भाईंदर येथील रुग्णालयातील 56 रुग्णांना डिस्चार्ज)
#Lockdown च्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध @MahaCyber1 ने दाखल केले ३४१ गुन्हे, १७७ जणांना अटक. मुंबई, नवी मुंबई मध्ये नवीन गुन्ह्यांची नोंद. pic.twitter.com/dDLVZRUAx6
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 2, 2020
राज्यात नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये बीड 30, पुणे 27, जळगाव 26, मुंबई 21, कोल्हापूर 16, सांगली 12, नाशिक 12, बुलढाणा 12, नाशिक शहर 11, जालना 11, सातारा 10, लातूर 10, नांदेड 9, पालघर 9, ठाणे शहर 8, परभणी 8, नवी मुंबई 8, सिंधुदुर्ग 7, अमरावती 7, ठाणे 7, नागपूर शहर 7, हिंगोली 6 या प्रमुख जिल्हे तसेच शहरांचा समावेश आहे.