Accident (फोटो सौजन्य - ANI)

Accident On Bhiwandi Bypass Road: भिवंडी बायपास रोडवर (Bhiwandi Bypass Road) एका भरधाव कंटेनरने धडक दिल्याने एका 34 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. उमाशंकर महेश शर्मा असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तो भिवंडीच्या पाईपलाईन परिसरात फर्निचरच्या दुकानात काम करत होता. उमाशंकर शर्मा हा मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवासी होता. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भिवंडी बायपास रोडवर रिक्षा स्टॉपजवळ हा अपघात झाला. यावेळी कल्याणहून भिवंडीकडे जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने शर्माला धडक दिली. शर्मा कंटेनरच्या चाकाखाली येऊन चिरडला गेला.

या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिकांनी अपघाताची पोलिसांना माहिती दिली. शर्मा यांना भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर कंटेनर चालक कंटेनर सोडून पळून गेला. मृताचे नातेवाईक रामानंद प्रजापती यांनी सांगितले की, शर्मा दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून भिवंडीला आले होते. (हेही वाचा - AI Cameras on Pune Roads: पुणेकरांनो लक्ष द्या! आता रस्त्यावर राहणार AI कॅमेऱ्यांची करडी नजर; एफसी रोडवर केवळ अडीच दिवसांत 261 चालान जारी)

दरम्यान, शर्मा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. तथापि, रामानंद प्रजापती यांनी सांगितलं की, शर्मा यांच्या पश्चात उत्तर प्रदेशात एक सहा वर्षांची मुलगी आणि पत्नी आहे. मी त्यांच्या पत्नी आणि मुलीला याबद्दल माहिती दिली असून वाहतूक व्यवस्थेसाठी सामूहिक देणगी देऊन शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यास सांगितले आहे. तथापि, गरिबीमुळे कुटुंबातील सदस्यांनी मला भिवंडीत अंतिम संस्कार करण्यास सांगितले.

तथापि, कोनगाव पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी वैभव चुबळे यांनी सांगितले की, अपघातानंतर कंटेनरचा चालक पळून गेला. आम्ही कंटेनर जप्त केला असून चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. आम्ही त्याला न्यायालयात हजर करू. या अपघातामुळे बऱ्याचवेळ भिवंडी बायपास रोडवर वाहतुक विस्कळीत झाली होती.