Drug Peddlers Attacked On Sameer Wankhede: NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गोरगावमध्ये ड्रग पेडलरकडून हल्ला; 3 जणांना अटक
NCB Zonal Director Sameer Wankhede (PC - ANI)

Drug Peddlers Attacked On Sameer Wankhede: नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या टीमवर काल संध्याकाळी मुंबईच्या गोरेगाव येथे ड्रग पेडलरनी (Drug Peddlers) हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीचे दोन अधिकारी जखमी झाले आहेत. तसेच या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एनसीबीने सांगितले की, समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबीची टीम छापे टाकायला गेली होती. यावेळी सुमारे 60 जण ड्रग्ज पेडलर्स जमा झाले आणि त्यांनी एनसीबी टीमवर हल्ला केला. यावेळी दोन अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. मुंबई पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती हाताळत या हल्ल्याप्रकरणी तीघांना अटक केली.

कॅरी मॅनडिस, असं या ड्रग पेडलरचं नाव असल्याचं म्हटलं जात आहे. आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत मुंबई पोलिसांनी कॅरी मॅनडिस आणि त्याच्या तिन्ही साथीदारांना अटक केली आहे. कॅरीवर पश्चिम मुंबईत एलएसडी पुरवल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून एनसीबीला एलएसडी मिळालं आहे. कॅरी व्यतिरिक्त आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (हेही वाचा - Sanjay Raut On Bjp Devendra Fadanvis Ajit Pawar Oath: पहाटे पहाटे मला जाग आली…अजून ते झोपलेले नाहीत; संजय राऊत यांचा भाजपला पुन्हा टोला)

एनसीबीने शनिवारी कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. यापूर्वी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल यांचीदेखील विचारपूस केली होती. सध्या एनसीबी बॉलिवूडमधील ड्रग्जप्रकरणात जास्त लक्ष घालून आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक नावे समोर आली होती. त्यानंतर एनसीबीने अनेकांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.