Sanjay Raut On Bjp Devendra Fadanvis-Ajit Pawar Oath: पहाटे पहाटे मला जाग आली…अजून ते झोपलेले नाहीत; संजय राऊत यांचा भाजपला पुन्हा टोला
Sanjay Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटे पहाटे घेतलेल्या 'त्या' शपथविधीस आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे हा शपतविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना ( Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या शपथविधीच्या स्मृतींना उजाळा देत भाजपला टोला लगावला आहे. पहाटे पहाटे शपथ घेऊन त्यांनी भूकंप आणला होता. परंतू, या शपथविधीनंतर त्यांना पहाटे त्यांना जोरदार धक्के बसले. या धक्क्यातून ते अजूनपर्यंत सावरले नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ती पराट नव्हतीच मुळी. तो अंधकार होता. असी पाहाट पुन्हा येणार नाही. त्या पहाटे त्यांना जे काही धक्के बसले या धक्क्यातून ते अद्यापही सावरले नाहीत. संजय राऊत यांनी कवीवर्य सुरेश भट यांच्य एका गझलेचा दाखला देत टोला लगावताना म्हटले की, 'पहाटे पहाटे मला जाग आली…अजून ते झोपलेले नाहीत.' (हेही वाचा, Sanjay Raut On Love Jihad Law: लव जिहादविरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात बनवू - संजय राऊत)

दरम्यान, संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेले विधान आणि लव्ह जिहाद अशा मुद्द्यांवरही भाष्य केले. शरद पवार यांना छोटे नेते म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून आगोदर माहिती घ्यावी. त्यानंतरच भाष्य करावे असे म्हटले. तर बिहारमध्ये नव्या सरकारमधील नितीश कुमार हे भाचचेच मुख्यमंत्री असल्याप्रमाणे आहे. त्यामुळे लव्ह जिहादबाबतचा कायदा प्रथम बिहारमध्ये आणावा. त्यानंतर महाराष्ट्रात कायदा करण्याबाबत बघू, असेही शिवसेना खासदार संजय राऊत या वेळी म्हणाले.