Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आजवर च्या सर्वाधिक अशा तब्ब्ल 5 हजार 24 नव्या कोरोना रुग्णांची तर, 175 मृत्युंची नोंद काल झाली आहे.यानुसार राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 52 हजार 741 वर पोहचली आहे. यापैकी 79 हजार 815 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये मुंबई शहरात 1 हजार 297 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 44 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या 72 हजार 287 वर पोहचली आहे. 4 हजार 177 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 39 हजार 744 जणांना कोरोनावर मात केली आहे. याशिवाय ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी जाणुन घेण्यासाठी खालील तक्ता तपासुन पाहा.

प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 71 हजार 875 नमुन्यांपैकी 1  लाख 52 हजार 765 नमुने पॉझिटिव्ह (17.52 टक्के) आले आहेत. तर राज्यात कोरोना रिकव्हरी रेट 52.25 टक्के व मृत्यूदर 4.65  टक्के एवढा आहे.इतका आहे, याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 72,175 4,179 39,744
ठाणे 30,871 816 13,094
पुणे 19,031 675 10,025
पालघर 4536 99 1382
औरंगाबाद 4356 224 2126
नाशिक 3433 205 1852
रायगड 3248 94 1830
जळगाव 2806 204 1496
नागपुर 1424 14 1005
अकोला 1370 73 857
सातारा 915 42 687
सोलापुर 2500 236 1371
कोल्हापुर 787 9 707
रत्नागिरी 537 25 398
धुळे 663 47 391
अमरावती 499 24 347
जालना 418 12 292
सांगली 323 9 196
नांदेड 309 12 231
अहमदनगर 304 12 240
हिंगोली 266 1 232
यवतमाळ 280 9 181
लातुर 256 15 176
उस्मानाबाद 194 8 147
सिंधुदुर्ग 192 4 148
बुलडाणा 186 12 134
गोंदिया 104 1 100
बीड 102 3 75
परभणी 92 4 75
नंदुरबार 153 7 52
भंडारा 79 0 56
वाशिम 87 3 58
गडचिरोली 61 1 50
चंद्रपुर 72 0 48
वर्धा 15 1 11
अन्य जिल्हे 124 23 0
एकुण 1,52,765 6931 79,815

दरम्यान देशात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत आज मोठी वाढ झाली आहे. ताज्या अपडेटनुसार, देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 5 लाखाचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात 18,552 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 08 हजार 953 इतकी झाली आहे. देशात मृतांचा आकडा 15,685 वर पोहोचला आहे तर आतापर्यंत 2,95,881 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.