SPPU Vice Chancellor Election: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) कुलगुरू पदासाठी निवडणूक (Vice Chancellor Election) होत असून या प्रक्रियेसाठी एकूण 27 अर्ज शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. यातील 17 अर्ज हे विज्ञान शाखेतील आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उद्धव भोसले यांच्यासह विद्यापीठाचे विद्यमान प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचेही नाव शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.
कुलगुरू पदासाठी बहुतांश पात्र उमेदवार हे विद्यापीठातील आहेत. मनोहर चासकर, डॉ.पराग काळकर, विज्ञान लेखक आणि इनोव्हेशन, रिसर्च अँड पार्टनरशिप सेंटरचे संचालक डॉ. संजय ढोले, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदेश जाडकर, माजी प्रमुख डॉ.सुरेश गोसावी, डॉ.विजय खरे, डॉ.अविनाश कुम्हार, डॉ. राजू गचे, डॉ.विलास खरात आदींचे अर्ज शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. (हेही वाचा -Thane: उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, Watch Video)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अशोक महाजन, प्रा.एम.एस.पगारे व प्रा.बी.व्ही.पवार, तर औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ. अशोक चव्हाण आणि डॉ.एम.बी.मुळे यांची नावेही शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या प्रा.डॉली सनी, प्रा.पी.ए.महानवर, प्रा.संजय देशमुख यांचाही समावेश आहे. तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील प्रा. संजय चव्हाण, प्रा.श्रीकृष्ण महाजन, प्रा.विजय फुलारी यांनीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज केला आहे.
दरम्यान, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून जिपक पानस्कर, उमरग्याच्या श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. धनंजय माने, यशवंत महाविद्यालय, नांदेडचे प्राचार्य गणेशचंद्र शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे एस. बी. देवसरकर हेही या स्पर्धेत आहेत. 18 आणि 19 मे रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.