Devika Rotawan (Photo Credit: ANI)

कोरोना संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. तसेच अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत  आहे. यातच मुंबईत 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याची प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटवन  (Devika Rotawan) हिलादेखील लॉकडाऊन काळापासून बऱ्याच अडचणी येत आहेत. यासाठी देविकाने तिला देण्यात आलेली आश्वासन पूर्ण करण्यात यावी, अशी विनंती सरकारकडे केली आहे. सध्या तिला सरकारच्या पाठिंब्याचीही गरज आहे, असेही ती एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली आहे.

लॉकडाऊन काळापासून तिला बरीच अडचणी येत आहेत. मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने तिला मदत आश्वासन दिले होते, ती पूर्ण करण्यासाठी तिने सरकारला विनंती केली आहे. देविका रोटावन म्हणाली की, "सरकारने तिला घर आणि सर्व प्रकारच्या मदती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही सरकारकडून काही मदत न मिळाल्याचे तिने सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले दहा लाख रुपये तिला टीबीवर उपचार करण्यासाठी उपयोगी पडले आहे. यासाठी तिने सरकारचे आभार मानले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये सध्या कोरोना विषाणूच्या 17,931 रुग्णांवर उपचार सुरु; आतापर्यंत तब्बल 1,11,967 रुग्ण झाले बरे

एएनआयचे ट्वीट-

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेंकाच्या नोकऱ्या गेल्या असून त्यांना बरोजगारीचा सामना करावा लागत आहे. मात्र, गेल्या काहीदिवसांपासून भारतात लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता देण्यात सुरुवात झाली आहे. ज्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.