मुंबई (Mumbai) मध्ये बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 587 रुग्णांची नोंद झाली आहे. ICMR संकेतस्थळावरील काही तांत्रिक अडचणींमुळे आज बाधित रुग्णांची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या उदया अदयवत करण्यात येईल, असे बीएमसीकडून सांगण्यात आले आहे. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,37,678 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 883 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 1,11,967 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 17,931 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज मुंबईमध्ये कोरोनाच्या 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 7,474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या पैकी 27 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 22 रुग्ण पुरुष व 13 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 28 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 7 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.79 टक्के आहे. (हेही वाचा: कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून 39,287 बेरोजगारांना रोजगार; जुलै महिन्यात तब्बल 21,572 लोकांना मिळाली नोकरी)
एएनआय ट्वीट -
587 new #COVID19 cases, 883 recoveries & 35 deaths reported in Mumbai today. The total number of positive cases increases to 1,37,678 in Mumbai, including 17,931 active cases, 1,11,967 recovered cases & 7,474 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Maharashtra pic.twitter.com/rK3fKiPQzu
— ANI (@ANI) August 25, 2020
24 ऑगस्ट 2020 पर्यंत मुंबईमध्ये झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 7,15,543 इतक्या आहेत, तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 88 दिवस झाला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 23 ऑगस्ट नुसार मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 599 इतकी आहे व सक्रिय सीलबंद इमारती या 5,936 आहेत. दरम्यान, राज्यामध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 10,425 रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,03,823 वर पोहोचली आहे. राज्यात मृतांचा एकूण आकडा 329 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात राज्यात 12,300 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 5,14,790 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.