Coronavirus: धारावीत (Dharavi) आज 26 नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून 2 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 859 वर पोहोचली आहे. आतापर्यंत धारावीत 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 222 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईतील धारावी, वरळी, दादर आदी ठिकाणं हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. राज्यात मुंबईमध्ये कोरोनाचे संक्रमण अधिक असून सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 1165 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 20 हजार 228 वर पोहोचली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Lockdown: लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 366 गुन्हे दाखल तर 198 जणांना अटक)
26 new #COVID19 positive cases, 2 deaths reported in Mumbai's Dharavi today; till now 859 positive cases and 29 deaths have been reported. 222 people discharged till date: Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/Rm8WXWRu6g
— ANI (@ANI) May 10, 2020
दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासांत देशात 3277 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 127 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 62,939 वर पोहोचली आहे. यात 41,472 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 19,358 रुग्ण बरे झाले आहेत.