Maharashtra Police COVID 19 Cases: मागील 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 55 कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.तसेच 1 कर्मचाऱ्याच्या मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे. यानुसार राज्यातील पोलीस दलातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा 4,103 वर पोहचला आहे तर मृतांचा एकूण आकडा हा 48 इतका आहे. दुसरीकडे मुंबई पोलीस दलात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा वाढलेला आहे. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील 31 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या पोलिसांसाठी महाराष्ट्र सरकार तर्फे 50 लाख रुपयांची मदत देण्याचे मागेच सांगण्यात आले होते, यासोबतच पोलीस केअर स्पेशल फंड मधून सुद्धा या मृत पोलिसांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयाची मदत आणि पोलीस दलात नोकरी सुद्धा देण्याची आश्वासन देण्यात आले होते.
दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा सुद्धा वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, राज्यात मागील 24 तासात 3,870 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1,32,075 इतकी झाली आहे. कालच्या दिवसभरात यापैकी 1591 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 65,744 इतकी आहे. राज्यात सध्या एकूण 60,147 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात काल 101 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 6,170 रुग्ण दगावले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
ANI ट्विट
1 death, 55 police personnel tested positive in the last 24 hours, the total number of positive cases in Maharashtra Police is now 4,103.
— ANI (@ANI) June 22, 2020
दरम्यान, काल, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी कोरोना लढ्यात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना शहीद म्हणून संबोधले जावे अशीही मागणी केली आहे. यामार्फत सिवासराटार जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलीस वर्गाला मानसिक धीर मिळेल अशी अपेक्षा आहे असेही सिंह यांनी म्हंटले होते.