महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) आढळून आले आहे. मुंबईत आज 1 हजार 109 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 49 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 986 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 368 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात आज 308 नव्या रुग्णांची भर पडली असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबई, पुण्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहे. दरम्यान, अनेक डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. हे देखील वाचा- Nisarga Cyclone: बीकेसी येथील कोविड सेंटरला निसर्ग चक्रीवादळाचा धोका; रुग्णांना तातडीने हलवण्यास सुरुवात
एएनआयचे ट्वीट-
22 deaths and 308 #COVID19 positive cases reported in the last 24 hours in Pune district. Death toll rises to 367 and positive cases are now 8134: Pune Health Department #Maharashtra
— ANI (@ANI) June 2, 2020
दरम्यान, प्रशासनाकडून सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात ठिकठिकाणी कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भर पडत चालली आहे. या काळात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.