Mumbai News: एका 55 वर्षीय व्यक्तीने पोलिस अधिकारी आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) असल्याचा बनाव करत असल्याचा दावा करत एका पीडितेला 21 लाखांचा गंडा लावला आहे. आपल्या पैशांची फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडितेची मनी लॉंड्रिग प्रकरणात चौकशी केली जात असल्याचा खोटा दावा केला जात होता. हेही वाचा- यापुढे सिग्नलवर आणि घरगुती समारंभमध्ये पैसे मागण्यास तृतीयपंथींना मनाई
मिळलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सांताक्रुझ येथीस रहिवासी आहे. तीने पोलिसांत सांगितले की, ३० डिसेंबर रोजी एक फोन आला होता. फोन ट्राय कडून असल्याचे दावा केला. फोन कायदेशीर लावण्यात आला असल्याचे भास करून दिला. त्यानंतर त्याने एक फोन लावून दिली. गंवडी येथील पोलिस अधिकारी असल्याचा फोनवरून सांगण्यात आला. तोतया पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तुमच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक करणाऱ्याने पीडितेला सांगितले की तुमचे बँक खाते देखील मनी लाँड्रिंगच्या उद्देशाने वापरले जात आहे, ज्याची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. आरोपीने पीडितेला त्याच्या एका बॅंक खात्यातील २१ लाख रुपये, पडताळणीच्या उद्देशाने बॅंक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. अन्यथा त्याचे अटक वॉरंट जारी करण्यात येईल आणि अटक केली जाईल. असं सांगितल्यावर पीडित घाबरल्या होत्या. त्यानी पुढे असं देखील सांगितले की, मनी लॉंड्रिंग प्रकरणात पैसे तपासल्यानंतर तीन दिवसातं त्याच्या बॅंक खात्यात परत जमा केले जातील. तीनं पैसे पाठवल्यानंतर घरातल्यांना या घटनेची माहिती दिली. काही दिवसांत पीडितेला समजले की,पैशांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.