Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आजच्या अपडेटनुसार, कोरोनाबाधितांंच्या संख्येत 20 हजार 598 नव्या रुग्णांंची वाढ झाली आहे ज्यानुसार राज्यातील एकुण बाधितांंचा आकडा 12 लाख 8 हजार 642 (Coronavirus Total Cases) वर पोहचला आहे. याशिवाय मागील 24 तासात राज्यात कोरोनामुळे 455 जणांंचा मृत्यु झाला आहे ज्यामुळे एकुण मृतांंचा आकडा 32,671 (COVID 19 Deaths) इतका झाला आहे. हे आकडे एकीकडे भीतीजनक असले तरी दुसरीकडे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांंची (Coronavirus Active Cases) संख्या अवघी 2,91,238 इतकीच असल्याने किंंचित दिलासा मिळत आहे. कालपासुन राज्यातील 26,408 बाधितांंनी कोरोनावर मात केली आहे आणि परिणामी आजवरच्या रिकव्हरी (Coronavirus Recovery) झालेल्या नागरिकांंचा आकडा सुद्धा 8,84,341 वर पोहचला आहे. या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य मंंत्रालयाने माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात पुणे आणि मुंंबई या दोन शहरात जणु काही कोरोना रुग्णवाढीची स्पर्धाच लागली आहे, आज मुंंबईत पुन्हा 2,236 रुग्णांची नोंद झाली असुन एकूण संक्रमितांची संख्या 1,84,313 वर पोहचली आहे. तर पुण्यात सुद्धा 1700 नव रुग्णांंसह 1,31,781 इतकी एकुण कोरोनाबाधितांंची संख्या झाली आहे. 106 year-old Maharashtra woman beats Covid-19: महाराष्ट्रातील 106 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात; KDMC च्या कोविड हॉस्पिटलमधील आज डिस्चार्ज
ANI ट्विट
Maharashtra reported 20,598 new COVID-19 cases, 26,408 discharges and 455 deaths in the last 24 hours, taking total cases to 12,08,642 including 8,84,341 discharges, 32,671 deaths and 2,91,238 active cases: State Health Department pic.twitter.com/VUkwEDCV3n
— ANI (@ANI) September 20, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांंचा रिकव्हरी रेट 73.17% इतका झाला आहे, तर मृत्युदर 2.7% इतका आहे. प्राप्त माहितीनुसार आजवर राज्यात 58 लाख 72 हजार 241 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत ज्यातील एकुण बाधितांंचा आकडा पाहिल्यास कोरोना रुग्ण आढळण्याचा रेट हा 20.58% इतका आहे.