Blast At Factory In Shahad: शहाड येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 2 ठार, 6 जखमी
Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

Blast At Factory In Shahad: ठाणे जिल्ह्यातील शहाड (Shahad) येथील सेंच्युरी रेयॉन (Century Rayon factory) कारखान्यात शनिवारी दुपारी झालेल्या स्फोटात 2 कामगार ठार झाले तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस कंटेनर भरत असताना हा स्फोट झाला. कंपनीमध्ये नायट्रोजन गॅसचा एक टँकर आणण्यात आला होता. जो CS2 (कार्बन डायसल्फाइड) ने भरला होता. टँकरच्या तपासणीदरम्यान स्फोट झाला. (हेही वाचा - Mumbai Fire News: दादर येथील टॉवरल भीषण आग,श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून त्यांना आयसीयूमध्ये हलवावे लागले.

परिसरातील स्थानिकांनी सांगितले की, स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या परिसरातील चार ते पाच घरे हादरली. विशेष म्हणजे कंपनीच्या गेटवर बॅरिकेड लावण्यात आले असून मीडियाला आत जाण्यापासून रोखण्यात आले आहे.