Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Fire News: मुंबईतील दादर (Dadar) पूर्वेकडील हिंदू कॉलनी परिसरातील एका निवासी टॉवरला भीषण आग (Fire) लागली. शनिवारी ही घटना सकाळी घटली आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,  G+15 मजल्यांच्या हायराईजच्या 13व्या मजल्यावर आग लागली. सकाळी बीएमसीच्या महापालिका अग्निशमन दलाकडून आगीच्या घटनेबाबत माहिती मिळाली. एका व्यक्तीला भीषण आगीच्या धुरामुळे श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सायनमधील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल (LTMG) हॉस्पिटलमधील उपस्थित डॉक्टरांकडून माहिती घेण्यात आली. सचिन पाटकर या 60 वर्षीय पुरुषाचे नाव धुरामुळे गंभीररित्या त्रास झाला, ज्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याने काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आग कशाने लागली याचं कारण अद्यापही स्षट झाले नाही. पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहे.