महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 2 कोटी 79 लाखांचा खर्च
Maha Vikas Aghadi Government | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) शपथविधी सोहळ्यात एकूण 2 कोटी 79 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती माहिती आरटीआय अंतर्गत करण्यात आलेल्या अर्जावरील उत्तरातून पुढे आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे मुंख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याही शपथ घेतली होती. उस्मानाबाद येथील आरटीआयचे कार्यकर्ता निखिल चनभट्टी यांच्या द्वारा मागण्यात आलेल्या माहितीत शपथ विधी सोहळ्यात एकूण 2 कोटी 79 लाख रुपये खर्च झाल्याची समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथ विधी सोहळ्यात एकूण 98 लाख 37 हजार रुपयांचा खर्च आला होता.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर या आघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा कॅबिनेट मंत्र्यांना यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली होती. या शपथविधी सोहळ्याचा भव्य सेट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारला होता. या दिमाखदार अशा सोहळ्यावर २ कोटी 79 लाख इतका खर्च करण्यात आल्याची माहिती आता पुढे आली आहे. हे देखील वाचा- तान्हाजी चित्रपट करमुक्त करा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

भव्य शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दवेंद्र फडणवीस, रिलायंस कंपनीचे चेयरमॅन ​​मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खडगे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलाथ, डीएमके अध्यक्ष एमके स्टालिन देखील उपस्थित होते. शिवसेना, राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे.