उत्तर प्रदेश आणि हरयाणा या दोन्ही राज्यांनी तान्हाजी (Tanhaji) चित्रपट करमुक्त केला आहे. यामुळे तान्हाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रातही (Maharashtra) हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी मागणी केलेले पत्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पाठलेल्या पत्रात म्हटले आहे की, तानाजी मालसुरे (Tanhaji Malusare) हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे. तसेच त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पीढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाअधिक लोकांनी पाहावा, यासाठी तो करमुक्त करण्यात यावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासात कोंढाणा किल्ला सर करण्याचा तानाजी मालुसरे यांचा प्रसंग ऐतिहासिक आणि विलक्षण आहे. शिवछत्रपतींचे विश्वासू सहयोगी म्हणून तानाजी मालुसरे यांनी जिवाची बाजी लावून हा महत्त्वाचा गड सर केला आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. हे देखील वाचा- 'ही तर छत्रपतींच्या विरोधात बोलणारी मुघलांची औलाद' भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
ट्वीट-
‘तानाजी’ चित्रपट करमुक्त करा!
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी pic.twitter.com/yp1e12UpxI
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) January 15, 2020
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षनेत्याची भुमिका पार पाडत आहे.