आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक प्रदर्शित झाल्यानंतर राजकारणात उत्तर आणि प्रत्त्यूत्तराला सुरुवात झाली आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करण्यात आल्याने समर्थकांनी भाजपविरोधात अंदोलन देखील केली होती. शिवसेनेने “शिवसेना” हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी केला होता. यावर उदयनराजे भोसले यांनी वंशज असल्याचे पुरावे द्यावेत, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. यात आता भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी उडी घेत संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला हल्ला आहे. शिवसेनेचे खासदार छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागत असतील, तर ते निश्चितपणे सत्तेसाठी लाचार असलेली मुघलांची औलाद आहेत, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.
आजे के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाने राजकारणात नवीन वळण घेतले असून सत्ताधारी आणि विरोधीपक्षाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. यातच भाजप नेते प्रसाद लाड यांनी उदयन राजे भोसले यांची बाजून घेत संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांनी आपले अडनाव बदलून खान करावे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपतींवर प्रेम केले. तसेच छत्रपती यांच्या आर्शिवादाने शिवसेना बनवली. त्या पक्षाचे खासदार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशाजांकडे पुरावे मागत असतील तर, ते निश्चितपणे सत्तेसाठी लाचार असलेली मुघलांची औलाद आहे, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना यासाठी छत्रपतींच्या वंशजांची, संपूर्ण महाराष्ट्राची, देशाची आणि सर्व शिवप्रेमींची माफी मागायला सांगावी. नाहीतर हा शिवरायांचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान असेल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले. हे देखील वाचा-राज ठाकरे यांचं राज्य छोटं असलं, तरी ते त्या राज्याचे राजे आहेत: संजय राऊत
प्रसाद लाड यांचे ट्विट-
उदयनराजे यांनी एका पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. तसेच शिवसेना हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांना विचारले होते का? असा प्रश्न त्यावेळी त्यांनी उपस्थित केला होता. यावर संजय राऊत म्हणाले होते की, त्यांनी ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचे दैवत आहे. आम्ही जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा तुझी पूजा करु का? असे विचारायला जात नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.