
Coronavirus Positive Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 350 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2684 वर पोहोचला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 178 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. आतापर्यंत 259 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (State Health Department) माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. मुंबईत आज 204 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर आज मुंबईत दिवसभरात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1753 वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 111 जणांना कोरोनामुळे बळी गेला आहे. (हेही वाचा - Corona Update: भारतात कोरोना विषाणूचे थैमान; गेल्या 24 तासात 29 लोकांचा मृत्यू, तर 1 हजार 463 नव्या रुग्णांची नोंद)
18 deaths and 350 new #Coronavirus positive cases reported in Maharashtra today. Total number of cases stands at 2684 including 178 deaths and 259 recovered: State Health Department pic.twitter.com/Im3bpMMY5j
— ANI (@ANI) April 14, 2020
दरम्यान, भारतात गेल्या 24 तासांत एकूण 1 हजार 463 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच 29 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. भारतात आतापर्यंत एकूण 10 हजार 363 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय 339 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.