कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमवला असून देशात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra) ऑगस्ट महिन्यात 17 हजार 372 जणांना रोजगार (Employment) देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ही माहिती दिली आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये रोजगार मिळवून दिल्याची माहिती समोर येत आहे.
बेराजगार आणि उद्योजक यांच्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योग उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात देतो. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Kirit Somaiya यांनी केला 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप; मंत्री Hasan Mushrif करणार 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा
ट्वीट-
#कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांत ऑगस्ट २०२१ मध्ये १७ हजार ३७२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला- मंत्री @nawabmalikncp pic.twitter.com/BboKSDSeIW
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) September 14, 2021
दरम्यान, कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ऑगस्ट महिन्यात 17 हजार 272 जणांना नोकरी मिळाली आहे. यात मुंबई विभागात सर्वाधिक 6 हजार 190 जणांना रोजगार मिळाला आहे. याशिवाय, नाशिक विभागात 2 हजार 168, पुणे विभागात 4 हजार 629, औरंगाबाद विभागात 3 हजार 738, अमरावती विभागात 449 तर नागपूर विभागात 198 जणांना रोजगार देण्यात आला आहे.
इनोव्हेशन सोसायटी कार्यालयात आज कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी या बैठकीस कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्माजी, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवीजी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.