Maharashtra Monsoon Update| PHoto Credits: Twitter/ ANI

Maharashtra Monsoon Update Today: महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुन पावसाने चांगलाच जोर धरलाय. आता येत्या पाच दिवसात म्हणजे जवळपास शुक्रवार पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात, मराठवाडा व विदर्भ येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांंनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः सोलापुर,सांगली, लातुर, उस्मानाबाद, जळगाव, सिंधुदुर्ग या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मुंंबई आणि ठाणे परिसरात आयसोलेटेड भागात मध्यम ते मुसळधार पाउस होईल असा अंंदाज आहे. सातारा आणि सांगली येथे मागील काही दिवसांपासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अगोदरच नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत अशावेळी आणखीन पाउस अपेक्षित असल्याने या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भासह, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र 20 ते 22 ऑगस्टपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे.

के. एस. होसाळीकर ट्विट

दरम्यान, सातारा,सांगली आणि कोल्हापुर मध्ये प्रमुख धरणांंमधुन पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे परिणामी आजुबाजुच्या परिसरांना पुराचा धोका आहे, या भागात NDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे.