ऑनलाइन गेमिंगचे (Online Game) व्यसन असलेल्या 14 वर्षीय मुलाने रविवारी मध्य मुंबईतील हिंदमाता (Hindmata) परिसरात आत्महत्या (Suicide) केली. गेममधील कोणतेही काम किंवा आव्हानामुळे या मुलाने टोकाचे पाऊल उचलले का, याचा शोध घेण्यासाठी भोईवाडा पोलीस (Bhoiwada Police) त्याच्या मृत्यूचा तपास करत आहेत. बुधवारी पोलिसांनी सांगितले की इयत्ता 7 मधील विद्यार्थ्याला ऑनलाइन गेम फ्री फायर, एक प्रसिद्ध बॅटल रॉयल मोबाइल गेमचे व्यसन होते. ज्यावर सोमवारी भारत सरकारने चीनमधील इतर मोबाइल अॅप्ससह बंदी घातली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी बांधकाम कंपनीत डिझायनर म्हणून नोकरी करणाऱ्या मुलाच्या वडिलांना रविवारी संध्याकाळी 7.22 वाजता त्यांच्या मुलाचा फोन आला.
तो आपल्या पत्नीसोबत प्रवास करत असल्याने तो कॉल रिसिव्ह करू शकला नाही आणि काही मिनिटांनी त्याने परत कॉल केला असता मुलाने फोन कॉल्सला उत्तर दिले नाही. पालक घरी परतले असता खोली आतून बंद असल्याचे दिसले. वडिलांनी दरवाजाच्या वरची काचेची चौकट तोडून दरवाजा उघडला असता मुलाने आत्महत्या केल्याचे समजले. भोईवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हेही वाचा High Court Decision: पहिला विवाह कायदेशीररीत्या रद्द केल्याशिवाय दुसऱ्या पत्नीला पतीच्या पेन्शनचा लाभ मिळणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला असून त्यातील सर्व डेटा मिळवला आहे. त्याचा फोन कॉल डिटेल्स आणि इंटरनेट ब्राउझिंग हिस्ट्री देखील तपासली जात आहे. त्याने इंटरनेटवर ऑनलाइन गेम आणि क्रिकेटशी संबंधित ऑनलाइन साइट्स सर्फ केल्या, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. मोबाइल गेमचा सर्व्हर सिंगापूरमध्ये असल्याने मुलाच्या गेमिंग क्रियाकलापांची माहिती आम्हाला त्वरित मिळणार नाही, असे डीसीपी पाटील यांनी सांगितले.
मुलाने लिहिलेली कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. त्याच्या मित्रांसोबतच्या मोबाईल संभाषणातून काहीही महत्त्वाचे सापडले नाही. तो अभ्यासू होता असे त्याचे शिक्षक सांगतात. त्याच्या पालकांनीही कोणत्याही संशयास्पद गोष्टीची तक्रार केली नाही, असे भोईवाडा पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र पवार यांनी सांगितले. आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत, असे डीसीपी म्हणाले.