Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत आज आणखी 1 हजार 263 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 44 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 92 हजार 720 वर पोहचली आहे. यापैंकी 5 हजार 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- COVID19 Cases in Dharavi Today: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 2 हजार 375 जणांना कोरोनाची लागण; दिवसभरात 5 नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिकेचे ट्वीट-

 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील, अशी माहिती राज्य शासनाच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे.