महाराष्ट्र 10वी बोर्डाचा निकाल (SSC 10th Result ) आज लागला आहे. राज्यात 96.94 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. यावेळी पुन्हा मुलींनी मुलांपेक्षा वरचढ ठरला आहे. कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल दाखवला आहे. कोकण विभागातील 99.27 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. कोल्हापूर विभागातील 98.50 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. लातूरचा 97.27 टक्के तर नागपूर विभागाचा 97 टक्के निकाल लागला आहे. पुण्याचा निकाल 96.96 टक्के लागला असून मुंबई विभागातून 96.94 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. अमरावती विभागाचा निकाल 96.81 तर औरंगाबाद विभागाचा निकाल 96.33 लागला आहे. हेही वाचा mahresult.nic आणि ssc.mahresults.org.in वर जाहीर झाला Maharashtra Board 10th Result 2022; असा करा चेक
नाशिकची 95.90 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. राज्यातील 122 विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 29 शाळांचेही शून्य टक्के आले आहेत.