Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 1165 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 20 हजार 228 वर पोहोचली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (Health Department) माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईतील धारावी, वरळी, दादर आदी ठिकाणं हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. धारावीत आज कोरोनाचे 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच एका कोरोना रुग्णाचा बळी गेला आहे. धारावीत आतापर्यंत 833 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus: मुंबईतील 'सेव्हन हिल्स' रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या)

दरम्यान, आज सकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3320 नवे रुग्ण आढळून आले असून 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या 59,662 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 1981 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 39,834 रुग्णांवर उपचार सुरु असून 17847 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.