महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मागील 24 तासांत 11,015 रुग्ण आढळले असून 212 रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची (COVID-19 Positive) एकूण संख्या 6,93,398 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज दिवसभरात 14,219 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 5,02,490 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य घडीला राज्यात 1,68,126 रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट 72.47% इतका झाला आहे. तर मृत्यूदरही 3.24% इतका झाला आहे. आतापर्यंत राज्यात 36,63,788 कोरोना चाचण्या झाल्या असून 6,93,398 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात 12,44,024 रुग्ण हे होम क्वारंटाईन असून 33,922 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. COVID-19 Cases in Dharavi: धारावीत 2 नव्या रुग्णांसह या भागात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2713 वर- BMC
11,015 new #COVID19 cases and 212 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 6,93,398 including 5,02,490 recoveries and 1,68,126 active cases: State Health department pic.twitter.com/QtERiuzQoL
— ANI (@ANI) August 24, 2020
भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 31,06,349 पर्यंत पोहचला आहे. भारतामध्ये मागील 24 तासांमध्ये 61,408 नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर 836 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आत्तापर्यंत 23,38,036 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर पूर्ण मात केली आहे. तर 57,542 जणांची कोरोना विरूद्धची लढाई यशस्वी ठरल्याने निधन झाले आहे. दरम्यान भारतामध्ये 24 तासांमध्ये 57,468 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.