Tablighi Jamaat members at Delhi's Nizamuddin Markaz (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण भारताला हादरून टाकले आहे. दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरातील मरकज येथे गेल्या काही दिवसांपूर्वी तबलिगी जमातचा (Tablighi Jamaat) कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाला परदेशातील नागरिकांनी  मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. परंतु, तबलिगी जमातच्या कार्यक्रमास सामील झालेल्यांपैकी काहीजणांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे भारतात कोरोनाच्या संख्येत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. तसेच या क्रार्यक्रमास गेलेल्या तबलिगींना स्वत:हून माहिती देण्यास सांगितले होते, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला होता. अशाच 10 तबलिगींना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज अटक केली आहे. तबलिगी जमातचे हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमं लावण्यात आली आहेत. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

नवी दिल्लीतील निजामुद्दीन तबलिगी जमातचा जो कार्यक्राम झाला त्यांनतर देशाताली अनेक राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. महत्वाचे म्हणजे, तबलिगी जमातने माहिती लपवून ठेवल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. आता या प्रकरणातील 10 परदेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Thane: सोसायटीच्या गच्चीवर, कॉमन एरियामध्ये एकत्र येण्यास बंदी; TMC ने जारी केले पत्रक

पीटीआयचे ट्वीट-

जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 3 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 28 हजार 380 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 886 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 हजार 362 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.