Badlapur: बदलापूर येथील एका नामांकित शाळेत मुलींवर अत्याचार झाल्यानंतर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की, मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यालयांप्रमाणेच शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन करणार आहे. हा निर्णय शालेय मुलीच्या सुरक्षतेसाठी महत्त्वाचा आहे. बदलापूर घटनेनंतर दीपक केसरकरांनी गंभीर दखल घेतली आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.(हेही वाचा- बदलापूरमध्ये शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा शाळेच्या गेटवर मोर्चा)
पत्रकार परिषदेत शिक्षण मंत्र्यांनी घेतला निर्णय
कॉर्पोरेट कार्यालयांप्रमाणे, शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन होणार आहे. यात नववी दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनीधी असतील, तसेच या प्रकरणी तक्रा दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलिस निरिक्षकांना निलंबित करावे अशी मागणी दिपक केसरकर यांनी गृहमंत्र्याकडे करण्यात आली आहे. बदलापूर प्रकरणात पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणी शाळेत सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले. त्यावरही कारवाई करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत दिपक केसरकर यांनी दिली.
#WATCH || मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यालयांप्रमाणेच शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर. @dvkesarkar #BadlapurCrime pic.twitter.com/IQWU3ZNxEc
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 20, 2024
बदलापूर अत्याचार प्रकरण
बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. या संतापजनक घटनेमुळे पालंकासह नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांनी आंदोलन केले. आंदोलन शांत करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.