
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन (Maharashtra Krushi Din) साजरा केला जातो. कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने 1 जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचा जन्मदिन 'महाराष्ट्र कृषी दिन' (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील.
शेतकरी आहे अन्नदाता
तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता,
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा!

करून शेती उगवून धान
यातचं खरी बळीराजाची शान
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कष्ट करीतो शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राब राबून घामात
ओली झाली काळी माती
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

करुनी आपल्या रक्ताचे पाणी
शेत पिकवी कास्तकरी
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शेती पिकवेल भक्कम
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तर देशात नांदेल सुख सम्रध्दी
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा!

दिवस शेतकरी राजाचा
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
